Bilaspur Conversion Racket Busted : बिलासपूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न; पाद्रीसह ६ जणांना अटक !

‘ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास आजार आणि गरिबी दूर होण्याचा केला दावा !

सौजन्य : Opindia

बिलासपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमधील बिलासपूर येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांची धर्मांतराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. श्रीरामनवमीच्या दिवशी बहतराई येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली चाललेला हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनांनी हाणून पाडला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाद्री दीपक सिंह सिदार यांचासह ६ जणांना अटक केली.

१. बहतराई येथील अटल आवासात दीपा गोटेल, पाद्री दीपक सिंह सिदार आणि त्यांची पत्नी पूजा सिदार आदींकडून अनुमाने ५० हिंदूंना त्यांचा धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जात होते.

२. श्रीरामनवमीच्या दिवशीही हिंदूंना उपचार सभेच्या बहाण्याने बोलावण्यात आले होते. ख्रिस्ती मिशनरी या लोकांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते. या धर्मांतराविषयी माहिती मिळताच हिंदु संघटनांच्या कार्यकर्ते तेथे पोचले आणि त्यांनी हे धर्मांतर रोखण्याचा प्रयत्न केला.

३. धर्मांतराची माहिती मिळताच सरकंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी नीलेश पांडे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोचले. घटनास्थळावरून पोलिसांनी दीपा गोटेल, पाद्री दीपक सिंह सिदार, पूजा सिदार, गुरविंदर सिंह, शिवकुमार धीवार आणि मधु कुमार केवट यांना कह्यात  घेतले.

संपादकीय भूमिका

  • देशात प्रतिदिन कुठे ना कुठे अशा प्रकारे हिंदूंचे धर्मांतर होत असातंना अद्यापही देशव्यापी धर्मांतरविरोधी कायदा न होणे, हे अनाकलनीय आहे !
  • हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवणे, हा त्यांचे धर्मांतर रोखण्याचा एक प्रभावी उपाय आहे !