विद्यापिठाच्या माध्यमातून भारतीय तरुण जागतिक अर्थव्यवस्थेत नेतृत्व करण्यासाठी सिद्ध होणार !

मुंबई – देशातील पहिले ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाणार आहे, असे राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी घोषित केले.
ते म्हणाले…,
१. ‘विकसित भारत २०४७ मिशन’ची यशस्वी पूर्तता आणि भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण अन् तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देशातील पहिले कृत्रिम बुद्धीमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.
२. कृत्रिम बुद्धीमत्ता विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.
३. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने प्रेरित उद्योग आणि तंत्रज्ञान क्रांतीसाठी विद्यार्थी अन् तरुण यांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणारे हे विद्यापीठ असेल.

४. या विद्यापिठासाठी विशेष ‘टास्कफोर्स’ स्थापन करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली या धोरणाचा आराखडा सिद्ध होईल.
५. तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असेल. आमचे सरकार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नवसंकल्पनांच्या संधी निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणात परिवर्तन घडवून भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ घडवण्याच्या दृष्टीने कटीबद्ध आहे.
६. महायुती सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे हे विद्यापीठ अत्याधुनिक संशोधन आणि कौशल्य विकासासाठी केंद्रस्थानी राहील. हे विद्यापीठ भारतीय तरुणांना कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेत नेतृत्व करण्यासाठी सिद्ध करेल.
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित