B’deshi Terrorists Training Camp In Jharkhand : झारखंडमध्ये बांगलादेशातील आतंकवाद्यांनी दिले मुसलमानांना प्रशिक्षण

रांची (झारखंड) – बांगलादेशातील काही आतंकवादी झारखंडमध्ये घुसले होते. त्यांनी राज्यातील पाकूरमध्ये काही मुसलमानांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते परत गेले. हा प्रकार एका मोठ्या कटाचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. झारखंडमधील आतंकवादविरोधी पथकाला ही माहिती मिळाली आहे. यामुळे राज्यात अतीदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे.

१. बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार पडल्यानंतर बंदी घातलेल्या संघटना भारतविरोधी कारवाया करण्याचा कट रचत आहेत, असे म्हटले जाते. या कटाच्या अंतर्गत बांगलादेशी आतंकवादी भारतविरोधी कारवाया करण्यासाठी भारतात घुसले आहेत.

२. ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशा’चा (जे.एम्.बी.चा) आतंकवादी अब्दुल मम्मन बांगलादेशातून सीमा ओलांडून आला होता. तो मुर्शिदाबादमधील धुलियान मार्गे पाकूरला पोचला.

३.  ६ जानेवारी या दिवशी तो बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून पाकूरला पोचला. तेथील दुबराजपूर येथील ‘इस्लामिक दावत केंद्रा’त जहा-इंडिया आणि जे.एम्.बी. यांच्या आतंकवाद्यांमध्ये एक बैठक झाली. यामध्ये जे.एम्.बी.चा आतंकवादी अब्दुल मम्मन देखील सहभागी झाला.

४. पाकूर येथे प्रशिक्षण घेतलेल्या सर्व १५ जणांची नावे मिळाली आहेत. आतंकवादविरोधी पथकाच्या माहितीनुसार मुर्शिदाबादमधील जलंगी येथील अनेक लोकही या बैठकीला उपस्थित होते.

५. संथाल परगणा भागातील साहिबगंज आणि पाकूर येथे मध्ये बंदी घातलेली जिहादी आतंकवादी संघटना जे.एम्.बी. सक्रिय आहे. या संघटनेशी संबंधित संशयित आणि भूमिगत कार्यकर्त्यांची माहिती त्यांनी गोळा केली.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारचे आतंकवादी भारतात घुसतात आणि मुसलमानांना प्रशिक्षण देऊन परतही जातात, हे भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना लज्जास्पद !
  • बांगलादेशाची समस्या बांगलादेशातील हिंदूंसाठीच नाही, तर भारतासाठी किती धोकादायक झाली आहे, हे यातून अधिक स्पष्ट होते. असे असतांना भारताने निष्क्रीय रहाणे अपेक्षित नाही !