हिंदु जनजागृती समितीच्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ या उपक्रमाच्या अंतर्गत जोडले गेलेले धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये जाणवलेले पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती !
‘वर्ष २०१९ ते २०२३ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. त्यांमध्ये अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला, तसेच काही जणांनी साधनेला प्रारंभ केला.