भाग्यनगर (तेलंगाणा) – २४ ते २९ मार्च या कालावधीत भाग्यनगरमध्ये ६ दिवसांचे स्वसंरक्षणार्थ लाठीकाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाग्यनगरच्या विविध भागांतील ८० हून अधिक तरुण-तरुणींनी या शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरात ६ दिवसांत लाठीकाठीचे विविध प्रकार, नानचाकूचे प्रकार आणि स्वसंरक्षणाच्या विविध पद्धत शिकवण्यात आल्या. यासह या तरुणांचे ‘धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर प्रबोधन करण्यात आले. या शिबिरात अधिवक्ता, सनदी लेखापाल, संगणकीय अभियंते, अशा विविध व्यावसायिकांनीही सहभाग घेतला. या वेळी अनेकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात नियमित सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
वैशिष्ट्यपूर्ण
१. एका कायदेतज्ञांनी सांगितले, ‘‘समितीला कायदेशीर काही मार्गदर्शन हवे असेल, तर मी ते सेवा म्हणून करीन.’’
२. एका प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणार्थींना आणि समाजात वाटण्यासाठी समिती पुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ ग्रंथ प्रायोजित केले.
३. एका ६५ वर्षांच्या जिज्ञासूंनी प्रशिक्षणात शिकवण्यात आलेले सर्व प्रकार चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने केले.