कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागाचा निर्णय !
(आयटीआय म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्युट – औद्योगिक प्रशिक्षण संस्था)
मुंबई – राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागाने १५ जानेवारी या दिवशी राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) नावात पालट करण्याचा निर्णय घेतला आहे. या आयटीआय महाविद्यालयांना महापुरुष आणि क्रांतीकारक यांची नावे दिली जाणार अहेत. यात सर्वाधिक चंद्रपूर, नांदेड, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर यांसह एकूण ३० जिल्ह्यांतील आयटीआय महाविद्यालयांचा यात समावेश आहे.

या निर्णयांची कार्यवाही करण्याविषयी संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. त्यामध्ये आयटीआय कॉलेजचे नामकरण करण्यात आले. ‘शिवशाहीर’ बाबासाहेब पुरंदरे (माजलगाव), ‘पद्मविभूषण’ पांडुरंगशास्त्री आठवले (म्हसळा), परमवीर चक्र विजेता नाईक जदूनाथसिंह (मोहोळ), ‘परमवीरचक्र’ विजेता लान्स नाईक कदम सिंह (सांगोला), ‘परमवीरचक्र’ विजेता मेजर सोमनाथ शर्मा (अकलूज), अंतराळवीर कल्पना चावला (संग्रामपूर), तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (वाई), श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (दहीवडी) अशी काहींना नावे देण्यात आली. यांसह क्रांतीकारी, कृषीभूषण, हुतात्मा, स्वातंत्र्यसैनिक, लोकनेते, आयुर्वेदाचार्य, संत आणि शिक्षण महर्षी यांची नावे दिली जाणार आहेत.