पहलगाम आक्रमणाचा सूत्रधार आतंकवादी सैफुल्ला कसुरी याचा कांगावा !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा आम्ही निषेध करतो. या आक्रमणाच्या निमित्ताने भारतीय माध्यमांनी मला उत्तरदायी धरले आहे. पाकिस्तानवरही आरोप करण्यात आले आहेत. ही दुःखद गोष्ट आहे. भारत पाकिस्तानला नष्ट करू इच्छितो. तो एक क्रूर शत्रू आहे. त्याने काश्मीरमध्ये १० लाखांचे सैन्य पाठवून युद्धाचे वातावरण निर्माण केले आहे. पहलगाममध्ये भारतानेच आक्रमण केले आहे आणि तो त्यासाठी उत्तरदायी आहे. हे त्याचे षड्यंत्र आहे. पाकिस्तानचा याच्याशी काहीही संबंध नाही, असा कांगावा या आक्रमणाचा सूत्रधार असणारा लष्कर-ए-तोयबाचा उपकमांडर सैफुल्ला कसुरी याने एक व्हिडिओ प्रसारित करून केला आहे.

संपादकीय भूमिकापाकने गेली ३५ वर्षे भारतात आतंकवादी कारवाया करत आहे; मात्र एकाही आक्रमणाचे दायित्व त्याने कधीच स्वीकारलेले नसल्याने तो आताही तेच म्हणत आहे, यात आश्चर्य काहीच नाही ! |
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russian President Putin
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !