Chhattisgarh Return To Hinduism : छत्तीसगडमध्ये १२० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

श्रीरामकथेमुळे प्रभावित होऊन हिंदु धर्मात प्रवेश करणार्‍या लोकांचे प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी पाय धुतले.

सीतास्वयंवराच्या वेळी भंग पावलेल्या धनुष्यासमवेत झालेले श्रीरामाचे संभाषण !

माझे दोन तुकडे झाले; पण त्या तुकड्यांमुळे दोन जिवांचे (राम-सीतेचे) मीलन झाले.

रामराज्यात निःष्पक्ष न्यायदान असणे

स्वार्थ, आपमतलबीपणा, चारित्र्यहीनता इत्यादींसारखे दोष रामराज्यात राज्याधिकार्‍यांच्या मधे औषधालाही शोधून सापडत नसत; म्हणून आज लोकांना रामराज्याची तळमळ लागली आहे.’

श्रीराममंदिर झाले आता वेळ बळकट राष्ट्र मंदिर उभारणीची !

रामराज्यातील नागरिक हे प्रामाणिक, साधे, सरळ आणि कष्टाळू होते. जे रामराज्य आणण्यासाठी श्रीराममंदिराचा लढा उभारला गेला, ते प्रत्यक्षात आणणे, हे नागरिकांचे कर्तव्य आहे.

अयोध्या येथे श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामनाथी आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिरातील रामशिळेचे दर्शन घेतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

मला रामशिळेवर नेहमी हनुमानाचा आकार दिसतो. मला त्या हनुमानाच्या आकाराच्या बाजूला श्रीरामाचे मुख दिसून ‘श्रीरामाने हनुमानाला छातीशी धरले आहे’, असे जाणवले.

संपूर्ण रामायण स्वतःतच घडत असते !

श्रीराम सहज, साधा-सरळ; पण दृढनिश्चयी आहे. तो केवळ आपल्या मित्रांचाच शुभचिंतक नाही, तर त्याच्या आश्रयाला येणार्‍या शत्रुंनाही अभय देतो. राम एक भाऊ, एक पती, एक मित्र आणि एक राजा या अशा सर्व भूमिकांमध्ये…

रामायण आणि भारताचे परराष्ट्र धोरण

‘अहिंसा, दया, विद्वत्ता, सुशील, आत्मसंयम आणि शांत चित्त हे गुण मर्यादा पुरुषोत्तमाची शोभा वाढवतात’, अशा वचनाचा संस्कृत श्लोक आहे. रामाकडून आत्मसात् केलेले हेच ६ गुण परराष्ट्र धोरणाची मुख्य उद्दिष्ट म्हणून सहस्रो वर्षांपासून भारताची शोभा वाढवत आहेत.

श्रीरामाच्या आरतीच्या वेळी पू. (श्रीमती) वैशाली मुंगळेआजी (ईश्वरपूर (सांगली)) यांच्या घरी आपोआप आलेली नामजपाची माळ !

आरतीला आलेल्या सर्वांना विचारले, ‘‘ही माळ कुणाची आहे ?’’ तिथे आलेल्यांपैकी कुणाचीही ती माळ नव्हती. संतांनी ती माळ पाहून सांगितले, ‘‘साक्षात् श्रीरामाने तुम्हाला ही माळ भेट दिली आहे.’’

श्रीलंका सरकार रामायण काळातील ५२ ठिकाणे विकसित करणार !

श्रीलंका सरकार श्रीलंकेतील रामायण काळातील ५२ ठिकाणे विकसित करणार आहे. ‘रामायण ट्रेल’ नावाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि न्यासाचे पदाधिकारी यांनी नुकतेच ‘रामायण ट्रेल’ प्रकल्पाचे उद्घाटन केले.

प्रभु श्रीराम आणि भक्तशिरोमणी हनुमान यांच्या भावस्पर्शी भेटीचे दर्शन घडवणारी भावकविता !

‘वर्ष २०१३ मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी मला प्रभु श्रीराम आणि हनुमान यांच्या भावस्पर्शी भेटीचे सूक्ष्मातून दर्शन झाले, तेव्हा देवाच्या कृपेने त्यांच्या भावभेटीवर मला पुढील कविता स्फुरली. त्याचे टंकलेखन मी आता केले.