बेंगळुरू (कर्नाटक) – ५०० वर्षांनंतर अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिल्यानंतर देशभरात श्रीराममय वातावरण असतांना कर्नाटकात मात्र ‘रामनगर’ या जिल्ह्याचे नाव ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्याचा जो निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आहे, त्याचा हिंदु जनजागृती समितीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. श्रीरामाचा देश म्हणून प्रसिद्ध असणार्या भारतात जर श्रीरामाचे नाव पुसले जाणार असेल, तर ते हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. सदर निर्णय हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे.
Bengaluru South District: ರಾಮನಗರ ಮರು ನಾಮಕರಣಕ್ಕೆ ಹಿಂದು ಜನಜಾಗೃತಿ ಸಮಿತಿ ತೀವ್ರ ವಿರೋಧ; ಉಗ್ರ ಪ್ರತಿಭಟನೆ ಎಚ್ಚರಿಕೆ.
https://t.co/bnKSe4ssUT pic.twitter.com/JDE4kPHIb9— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@MohanGowda_HJS) July 28, 2024
काँग्रेसने अगोदर श्रीरामाला काल्पनिक म्हटले, त्यानंतर श्रीरामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत आणि आता रामनगरचे नाव पालटले. यावरून काँग्रेसचा श्रीरामाला असलेला विरोध स्पष्ट दिसत आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी म्हटले आहे.
Congress’s decision to rename ‘Ramanagara’ to ‘Bengaluru South’ indicates their anti-Shriram stance : @MohanGowda_HJS @HinduJagrutiOrg
If the name of Shriram is being erased in India, the land of Shriram, the Hindu community will never tolerate
Read :https://t.co/MtrZ2Iff4P pic.twitter.com/s4QMa7cg2a
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 30, 2024
श्री. गौडा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, ‘रामनगर’ नाव पालटण्याचा निर्णय घेणार्या काँग्रेसने कधी धर्मांध क्रूर औरंगजेबाच्या नावाने असलेल्या देहलीतील औरंगजेब रोड, तुघलक रोड आदी रस्त्यांना असणारी मोगल आक्रमकांची नावे पालटण्याचा प्रयत्न केला आहे का ? कर्नाटकातील शहरांची इस्लामी नावे पालटण्याचे धाडस राज्य सरकार दाखवणार का ? ‘रामनगर’चे नाव पालटण्याला हिंदूंचा तीव्र विरोध असून हे नाव पालटण्याचा निर्णय मागे घेतला नाही, तर हिंदु समाज रस्त्यावर उतरल्याखेरीज रहाणार नाही.