कावड यात्रेपूर्वी बरेलीमध्ये धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न !
बरेली (उत्तरप्रदेश) – कावड यात्रेपूर्वी धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यात समोर आली आहे. येथे आमिर अली नावाच्या तरुणाने सामाजिक माध्यमांवर भगवान श्रीरामाचा अपमान करणारा व्हिडिओ प्रसारित केला. १० जुलै २०२४ या दिवशी हिंदु संघटनांनी आमिर अलीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करून कठोर कारवाईची मागणी केली होती. (हिंदू नेहमीच कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतात. हिंदूंना हिंसक म्हणणार्यांना हिंदूंची ही सहिष्णुता दिसत नाही ! – संपादक) या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आमिर अलीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. आमिर अलीने त्याच्या फेसबुकवर प्रसारित केलेल्या या व्हिडिओमध्ये भगवान श्रीरामाला त्याची आई शिवीगाळ करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
Case registered against Aamir Ali for insulting Prabhu Shri Ram !
This is nothing but an attempt to disturb the religious harmony in Bareilly before the Kanwar Yatra !
Please note that those who call Hindus intolerant are now silent !#HindusUnderAttack #UttarPradeshNews pic.twitter.com/7PqaZxeNwl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 12, 2024
पोलीस उपनिरीक्षक पवन कुमार यांनी सांगितले की, भगवान श्रीरामाला अपशब्द वापरणारा हा व्हिडिओ आमिर अलीने प्रसारित केला होता. आमिर हा बरेलीच्या बारादरी भागातील रहिवासी आहे. आमिर अलीला याला फेसबुकवर असे व्हिडिओ पोस्ट करून मोहरम आणि कावड यात्रेपूर्वी तणाव पसरवायचा आहे, असा पोलिसांचा आरोप आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंना असहिष्णु म्हणणारे अशा वेळी गप्प बसतात, हे लक्षात घ्या ! |