आपत्काळात भक्तीच तारणहार !

ईश्वराप्रती परम प्रेम म्हणजे भक्ती ! मानवाचा सर्वश्रेष्ठ धर्म म्हणजे भगवान श्रीकृष्णाप्रती असणारी भक्ती !

कृतज्ञताभावात राहिल्यास निराशा न येता मन आनंदी होऊन साधना अधिक चांगली करता येईल !

साधकांना साधनेत प्रगती करता येत नसली, स्वभावदोष आणि अहं यांच्यावर मात करता येत नसली, तर त्यांना ‘भावजागृतीसाठी प्रयत्न करा. भाव जागृत झाला की, साधनेतील बरेच अडथळे दूर होतील आणि प्रगती होईल’, असे सांगण्यात येते.

अनुभूती का येते ? याचे शास्त्र सांगणारे ज्ञान !

‘अनुभूती येणे हे सर्वस्वी साधकाच्या भावावर अवलंबून असते. जसा भाव, तशी अनुभूती. समोरच्या उन्नतांची आध्यात्मिक पातळी कितीही असली, तरी साधकाचा भाव जेवढा असेल, त्या प्रमाणातच अनुभूतीचे मापन होते.’

गोपीभाव (गोपींचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव)

गोपींचा श्रीकृष्णाप्रती अनन्यसाधारण भाव होता. असाच गोपीभाव सनातनच्या काही साधिकांमध्येही आहे. गोपीभावाचे दर्शन घडवणारी ही ग्रंथमालिका म्हणजे द्वापरयुगच जणू पुन्हा अवतरल्याची प्रचीती ! ही ग्रंथमालिका वाचा आणि गोपींप्रमाणे श्रीकृष्णभक्त होण्याचा प्रयत्न करा !

देवता आणि गुरु यांची पूजा भावपूर्ण केल्यासच ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील !

अध्यात्मातील कृती करतांना भाव महत्त्वाचा असतो. प्रार्थना, नामजप यांच्यासह देवता आणि गुरु यांची पूजा भावपूर्ण केल्यासच त्याचा आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो.

‘भावजागृतीचे प्रयत्न’, ही परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेली प्रक्रियाच आपत्काळात जगण्यासाठीची संजीवनी !

‘प्रत्येकामध्ये देवाने असा एक उत्तम गुण दिलेला असतो की, त्याचा योग्य वापर केल्यास त्याची सेवा आणि साधना यांची फलनिष्पत्ती वाढते.

नामजप आणि प्रार्थना करतांना अंतरीचा भाव जागृत होण्यास साहाय्य करणारे भावप्रयोग !

नामजप आणि प्रार्थना भावपूर्ण झाल्यास देवाला अनुभवता येते. त्यामुळे प्रार्थना करतांना इष्टदेवतेचे रूप डोळ्यांसमोर आणून डोळे मिटून ते रूप आठवत चरणांवर दृष्टी स्थिर ठेवल्यास अंतरीचा भाव जागृत होण्यास साहाय्य होते. यासाठी करावयाचे काही भावप्रयोग पुढे दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तळहात, तळपाय, जीभ, ओठ आणि डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील भाग गुलाबी होण्यामागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हात, तळपाय, जीभ, ओठ आणि डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील भाग गुलाबी झाले आहेत. हे त्यांच्या देहात स्थुलातून झालेले दैवी पालट आहेत. अशा प्रकारे देहामध्ये दैवी पालट होण्यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

देवाला ओळखण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता !

देवापुढे विनम्र होऊन इच्छित गोष्ट तळमळीने मागणे, याला ‘प्रार्थना’ म्हणतात. प्रार्थनेत आदर, प्रेम, विनवणी, श्रद्धा आणि भक्तीभाव या गोष्टी अंतर्भूत आहेत. प्रार्थना करतांना भक्ताची असमर्थता, तसेच शरणागती व्यक्त होत असते अन् तो कर्तेपण ईश्वराला देत असतो.