अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या श्रीराममंदिराच्या २२ जानेवारी या दिवशी झालेल्या प्राणप्रतिष्ठेनंतर १४ जुलैपर्यंत सुमारे २ कोटी भाविकांनी श्री रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. मंदिरात प्रतिदिन सुमारे १ लाख १२ सहस्र भाविक येत आहेत. सध्या उत्तर भारतात चालू असलेल्या श्रावण मासामध्ये या संख्येत वाढ होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
१. येथील महर्षी वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५ लाख २० सहस्र यात्रेकरू आतापर्यंत पोचले. प्रतिदिन सुमारे अडीच सहस्र विमान प्रवाशांची रहदारी होत आहे. अयोध्या स्थानकापासून ३२ रेल्वे संचालित आहेत.
२. अयोध्या हॉटेल असोसिएशनचे सचिव अनिल अग्रवाल म्हणाले की, ६० नवीन हॉटेल झाली आहेत. ३० हॉटेलचे काम चालू आहे.