रामभक्ती लक्ष्मणाची विद्या आणि आयुष्य होते. त्याचप्रमाणे रामाचा बंधू भरतानेही उच्च कोटीची रामभक्ती अनुभवली. राम वनवासात असतांना भरत नंदीग्रामी राहिला. त्यानेही श्रीरामाप्रमाणे वल्कले नेसली, नेहमीचा आहार त्यागून फलाहार केला. श्रीरामाच्या पादुकांना आत्मनिवेदन करून, विचारून भरताने अयोध्येत राज्य केले. त्यामुळे भरताच्या नेतृत्वातही प्रजेने १४ वर्षे रामराज्याचीच अनुभूती घेतली. प्रभु श्रीराम अयोध्येत परतल्यावर भरताने श्रीरामाच्या चरणी राज्य पुन्हा अर्पण केले आणि श्रीरामाच्या आज्ञेनुसार राज्यातील कर्तव्ये केली. (संदर्भ : सनातनचा भक्तीसत्संग)