संच मान्यतेच्या सुधारित निकषाअन्वये पटसंख्या न्यून झाल्यास मुख्याध्यापकांचे पद रहित होणार !

खासगी शाळांना शासनमान्यतेविना नवीन शिक्षक संमती मिळत नाही. निवृत्त शिक्षकांची नियुक्ती ही नवीन शिक्षकांची भरती होईपर्यंतच असेल. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

पिंपरी येथील शाळेच्या स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही लावले !

‘जयहिंद हायस्कूल’च्या स्वच्छतागृहातील प्रकाराच्या विरोधात सामाजिक माध्यमातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. पालकांनीही विरोध केला. १६ मार्च या दिवशी पालकांनी शाळेमध्ये गर्दी करून त्या विरोधात निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये ‘आनंददायी शनिवार’ साजरा होणार !

स्तुत्य निर्णयाविषयी शासनाचे अभिनंदन ! मुलांना लहानपणापासूनच ‘आनंद कसा मिळवायचा ?’, हे शिकवल्यास आत्महत्या, निराशा यांचे प्रमाण न्यून होईल !

‘आगाशे विद्यामंदिर’ने आता राज्यातही यश मिळवावे ! –  डॉ. परकार

सातत्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट नियोजन, अच्युतराव पटवर्धन आणि जोग सरांची उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता, कार्यानुभव, शालेय सुंदर परिसर, बालमनावरील संस्कार यांमुळे शाळेला यश मिळाले.

Maharahstra Teacher Dress Code : महाराष्‍ट्रात शालेय शिक्षकांसाठी वस्‍त्रसंहिता लागू !

शिक्षण विभागाचा अभिनंदनीय निर्णय ! मंदिरांत वस्‍त्रसंहिता लागू झाल्‍यावर कोल्‍हेकुई करणार्‍यांना याविषयी काय म्‍हणायचे आहे ?

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७४ शाळा बंद !

विनामूल्य आणि सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदींच्या (प्रावधानांच्या) अन्वये प्रत्येक २० विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक असणे आवश्यक आहे; मात्र जिल्ह्यातील एकूण ३ सहस्र ७१७ जिल्हा परिषद शाळांपैकी १ सहस्र शाळांमधील पटसंख्या १० पेक्षाही अल्प आहे.

शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मिळणार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती योजनेचा लागू करावी, अशी मागणी गेली अनेक वर्ष शिक्षकेतर महामंडळाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात येत होती.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ७ सहस्र ५०० शाळांमध्ये राबवण्यात येणार ‘पर्यावरण सेवा योजना’ !

प्रत्येक वर्षी १ सहस्र अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने ५ वर्षांत ही योजना राबवण्यात येणार आहे. शाळेच्या नियमितच्या वेळेसह आठवड्यातील ३ घंटे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

Goa Schools Lottery Issue : शाळेसाठी निधी उभारण्यासाठी काढलेल्या सोडती (लॉटरीज) विद्यार्थ्यांना विकण्यास भाग पाडू नका !

असे शिक्षण खात्याला का सांगावे लागते ? असे कुठली शैक्षणिक संस्था करत असल्यास संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !

भारत ‘पाकिस्तान’ आहे का ?

मुसलमानांचा पवित्र मास रमझानच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळांमध्येच पालट केले आहेत. तसा आदेश राज्यातील शाळांना देण्यात आला आहे. आंध्रप्रदेश शालेय शिक्षण विभागानेही उर्दू माध्यमाच्या शाळांच्या वेळा पालटल्या आहेत.