विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षेसाठी शाळा परिसरात ‘दामिनी पथक’ नेमणार

शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा !

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

मुंबई – शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षेसाठी शाळा परिसरात ‘दामिनी पथक’ नेमण्‍यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली, तर ‘महिला आणि बालक यांच्‍या समस्‍या सोडवण्‍यासाठी तरुणांचे नेतृत्‍व वाढवण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यांच्‍या माध्‍यमातून कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्‍यात येईल. त्‍याद्वारे बालकांना सुरक्षित करण्‍यास सहकार्य लाभेल’, असे विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केले. महाराष्‍ट्र राज्‍य बाल हक्‍क संरक्षण आयोगामार्फत ‘बाल रक्षा अभियाना’चा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे करण्‍यात आला. त्‍या वेळी त्‍या बोलत होत्‍या. आयोगाच्‍या अध्‍यक्षा सुशीबेन शाह उपस्थित होत्‍या.