गेल्या १० वर्षांत मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या १०० हून अधिक शाळा बंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मुंबई महनगरपालिकेने ‘युनिफाईड डिस्ट्रिक्ट इनफॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (यू.डी.आय.एस्.ई.)’कडे शाळांची माहिती संकलित करून दिली. वर्ष २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात मुंबई महानगरपालिका मराठी माध्यमाच्या ३६८ शाळा चालवत होती. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शाळांची संख्या २६२ इतकी झाली आहे. म्हणजे १० वर्षांत १०० हून अधिक शाळा बंद झाल्या.

मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ म्हणाले, ‘‘अनेक पालकांना इंग्रजी माध्यमांच्या शाळा खुणावू लागल्या आहेत. ज्यांना तिथे प्रवेश मिळत नाही, ते दुसरा पर्याय म्हणून मराठी माध्यमाची शाळा निवडतात.’’

संपादकीय भूमिका

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. राज्य सरकारने ‘व्यापक मराठी भाषा धोरणा’ला मान्यता दिली. राजधानी देहलीत ७० वर्षांनी मराठी साहित्य संमेलन पार पडले. असे असूनही मराठी शाळांची ही दुर्दशा असणे, ही स्थिती सरकारची मराठी भाषेसंबंधी धोरणांच्या फलनिष्पत्तीविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करते, असा प्रश्‍न कुणी केला, तर त्यात चूक ते काय ?