शाळांमध्ये होणार्या बहिष्कारामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम ही पालकांसाठी चेतावणी !
लहान मुलांविषयी शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची असून मुलांना योग्य संस्कार असलेले शिक्षण देणे आवश्यक आहे !
लहान मुलांविषयी शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची असून मुलांना योग्य संस्कार असलेले शिक्षण देणे आवश्यक आहे !
तालुक्यातील पाल पुनर्वसन येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक (कुडासे खुर्द) शाळेतील इयत्ता ४ थीच्या वर्गाचे छत १४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी अचानक कोसळले. या वेळी माध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थी गेल्याने मोठा अनर्थ टळला.
लष्कर भागातील एका शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार करण्यात आले. मुलाशी अनैसर्गिक कृत्य केल्याच्या प्रकरणी अन्य एका शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. लष्कर भागातील एका शाळेच्या प्रसाधनगृहाच्या आवारात ही घटना घडली.
शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतांना शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून पालक आणि विद्यार्थी यांना ठराविक विक्रेत्यांकडून शाळेसाठी लागणारे साहित्य घेण्यास सक्ती करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
येथील नामांकित शाळेतील विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना ४४ दिवसानंतर अटक करण्यात आली.
समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच यावरून लक्षात येते. गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा न होणे आणि पोलिसांचा अल्प झालेला धाक हे यामागील मुख्य कारण आहे !
कधी काळी संस्कार घडवणारी ही शाळा आज मात्र बेगडी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदुत्वावरच घाला घालत मुलींचीही लव्ह जिहादच्या दृष्टीने मानसिकता घडवण्याचा प्रयत्न करत आहे. याला वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे !
बलात्कार करणार्यांना अल्पवयीन म्हणता येणार का ? आता अल्पवयीन संदर्भातील व्याख्या पालटण्याची वेळ आली असून अशांना प्रौढांना दिली जाते, तशीच शिक्षा करणे आवश्यक झाले आहे !
हुजूरपागा शाळेत श्रावणातील हळदी- कुंकु, दहीहंडी, गणेशोत्सव, गरबा, मकरसंक्रांत, वारी इत्यादी सण साजरे होतात का ? होत नसतील, तर का होत नाहीत ? व्हायला हवेत; कारण ती आपली संस्कृती आहे.