लडाखमध्ये भारतीय सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळून ९ सैनिकांचा मृत्यू

मृत सैनिकांमध्ये एका अधिकार्‍याचाही समावेश आहे. काही सैनिक घायाळही झाले आहेत. भारतीय सैनिक कारू गॅरिसन येथून लेहजवळील क्यारी शहराकडे जात होते. त्या वेळी ही घटना घडली.

भारत आपल्या सन्मानासाठी नियंत्रणरेषाही ओलांडू शकतो ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पाकिस्तान आणि चीन यांच्या भारतविरोधी कारवाया पहाता सैनिकांनी नियंत्रणरेषा ओलांडण्याची हीच योग्य वेळ आहे, असेच भारतियांना वाटते !

मणीपूरच्या प्रकरणावरून संसदेचे कामकाज काही वेळासाठी स्थगित !

सरकार चर्चेस सिद्ध असतांनाही विरोधी पक्षांकडून गदारोळ ! यावरून विरोधी पक्षांना मणीपूरच्या घटनेविषयी सुख-दुःख नाही, तर त्यांना यावरून  राजकारण करून सरकारला जाणीवपूर्वक वेठीस धरायचे आहेत, असेच दिसून येते !

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकच हा भाग भारतात विलीन करण्याची मागणी करतील ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. येथील जनताही भारतात येऊ इच्छित आहे. भारताच्या संसदेने पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे.

‘नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी’ आता ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ नावाने ओळखली जाणार !

केंद्रशासनाने देहलीतील ‘नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी’चे नाव पालटून आता ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ असे ठेवले आहे. माजी पंतप्रधान नेहरू यांचा या ठिकाणी १६ वर्षे निवास होते. त्यांच्या निधनानंतर येथे संग्रहालय करण्यात आले होते.

संरक्षण क्षेत्रात स्‍वयंपूर्णतेचे पाऊल !

केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रासाठी प्रत्‍येक वेळी आर्थिक तरतूद वाढवत असून वर्ष २०१९-२० मध्‍ये ५८ टक्‍के, वर्ष २०२१-२२ मध्‍ये ६४ टक्‍के, तर २०२२-२३ मध्‍ये ६८ टक्‍के इतक्‍या मोठ्या प्रमाणात रक्‍कम स्‍वदेशी गुंतवणुकीसाठी राखीव ठेवली.

आय.एन्.एस्. मुरगाव भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू !

‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ येथे बांधण्यात आलेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आय.एन्.एस्. मुरगाव ही दुसरी युद्धनौका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली आहे.

भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावले !  

चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

आदेश मिळाल्यास मागे वळून पहाणार नाही ! – लेफ्टनंट जनरल ए.डी.एस्. औजला

भारतीय सैन्याला पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा आदेश देण्यात काय अडचण आहे, हे जनतेला समजले पाहिजे !

चीनला शह देण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील ७५ प्रकल्पांचे केले लोकार्पण !

चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेला लागून भारताने ७५ प्रकल्प उभारले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या लडाख दौर्‍याच्या वेळी या प्रकल्पांचे लोकार्पण केले. २ सहस्र १८० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांत ४४ पूल, २८ रस्ते आणि २ ‘हेलिपॅड’ यांचा समावेश आहे.