Nirbhay Cruise Missile Test : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भुवनेश्‍वर (ओडिशा) – स्वदेशी तंत्रज्ञानाच्या ‘निर्भय’ या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी १८ एप्रिलला ओडिशातील चांदीपूरमध्ये घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डी.आर्.डी.ओ.) हिच्याकडून या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे.

निर्भय क्षेपणास्त्र सैन्याला मिळाल्यानंतर चीन आणि पाक सीमेवर तैनात केले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र समुद्र आणि भूमी यांवरून डागता येते. हे क्षेपणास्त्र ६ मीटर लांब आणि ०.५२ मीटर रुंद आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डी.आर्.डी.ओ.चे अभिनंदन केले आहे.