सैन्य खरेदी करणार ९७ ‘तेजस’ आणि १५६ ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर !
नवी देहली – केंद्रशासनाने भारतीय सैन्यदलाला आणखी बळकट करण्यासाठी २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला स्वीकृती दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘संरक्षण अधिग्रहण परिषदे’ने हा निर्णय घेतला.
कराराच्या अंतर्गत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय !
- ९७ ‘तेजस’ हलकी लढाऊ विमाने आणि १५६ ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरर्स खरेदी करणार
- ‘सुखोई एस्.यू.-३०’ लढाऊ विनामांचा ताफाही अद्ययावत करणार
- रणगाडे, ‘माऊंटेड गन सिस्टम’ आणि क्षेपणास्त्रेही खरेदी करणार
- ‘आत्मनिर्भर भारता’च्या अभियानाच्या अंतर्गत या करारामधील २.२ लाख कोटी रुपयांची खरेदी ही देशांतर्गत स्वरूपाचीच असणार.
४० सहस्र कोटी रुपयांच्या स्वदेशी ‘एअरक्राफ्ट कॅरिअर’ची खरेदी !
या कराराच्या अंतर्गत भारतीय बनावटीचे ‘एअरक्राफ्ट कॅरिअर’, म्हणजेच विमानवाहू युद्धनौका याच्या निर्मितीसाठीही तत्त्वत: स्वीकृती देण्यात आली आहे. या माध्यमातून भारताला हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या आक्रमक हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. यावर अनुमाने ४० सहस्र कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.