पुणे येथे ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा मान्‍यवरांच्‍या उपस्‍थितीत पार पडला !

विंग कमांडर श्री. विनायक डावरे (निवृत्त) यांच्‍या हस्‍ते ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले. ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचे लेखक कै. ह.त्र्यं. देसाई यांचे पुत्र श्री. भरत देसाई हे कार्यक्रमाला उपस्‍थित होते.

पुणे येथे शाळेच्‍या गाड्या, बसगाड्या यांची झडती !

खराडी परिसरात शाळेच्‍या गाडीला लागलेल्‍या आगीच्‍या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकांची संख्‍या वाढवून पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने (‘आर्.टी.ओ.’ने) सर्व शाळेच्‍या गाड्या, बस यांची पडताळणी चालू केली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ट्रेलरची फूड कोर्टला भीषण धडक; मुंबईत पोर्शे कारची दुचाकींना धडक !…

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने ट्रेलरने फूड कोर्टला भीषण धडक दिली. यात हॉटेल कामगार इंद्रदेव पासवान याचा मृत्‍यू झाला.

पुणे येथील वडाचीवाडी परिसरात १२ सहस्र लिटर गावठी मद्य जप्‍त !

कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावर वडाचीवाडी परिसरातील गावठी मद्य (दारू) सिद्ध करणार्‍या भट्टीवर काळेपडळ पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी जगदीश प्रजापती आणि गुलाब रजपूत यांना अटक करण्‍यात आली आहे.

‘बॅलेट पेपर’वर (मतपत्रिकेवर) निवडणुका घ्‍या ! – खासदार सुप्रिया सुळे

अमेरिकेसह अनेक देशांमध्‍ये इ.व्‍ही.एम्.वर (इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र) बंदी आहे. मी ४ वेळा इ.व्‍ही.एम्.द्वारे निवडून आले आहे. माझ्‍यासह समाजातही इ.व्‍ही.एम्.विषयी अस्‍वस्‍थता आहे. म्‍हणूनच इ.व्‍ही.एम्. ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर निवडणुका घ्‍या, अशी मागणी होत आहे.

पुणे येथे शिकवणीवर्गात अल्पवयीन मुलीशी अल्पवयीन मुलाचे अश्लील कृत्य !

मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी शाळेत नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे आवश्यक !

काँग्रेसचे पृथ्‍वीराज चव्‍हाण यांची भारतीय जनता पक्ष आणि राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ यांच्‍यावर टीका !

मोहन भागवत आणि भारतीय जनता पक्ष ‘फॅसिस्‍ट’ (हुकूमशाह) असून हिटलर ही त्‍यांची प्रेरणा आहे. त्‍यामुळे ‘समाज वाचवायचा असल्‍यास तीन मुले जन्‍माला घाला’, या त्‍यांच्‍या विचारावर काय बोलणार ? अशी टीका माजी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी केली.

निवडणुकीतील पराभवामुळे ११ नेत्‍यांनी केली फेरमतमोजणीची मागणी !

महाविकास आघाडीचे अनेक मोठे उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाल्‍याने त्‍यांनी पराभवाचे खापर इ.व्‍ही.एम्. यंत्रावर फोडले आहे. निवडणूक अधिकार्‍यांनी या यंत्रामध्‍ये फेरफार केल्‍याने पराभव झाल्‍याचा आरोप वरिष्‍ठ नेत्‍यांनी केला आहे.

‘महारेरा’ने बांधकाम व्‍यावसायिकांकडून हानीभरपाईपोटी २०० कोटी रुपये वसूल केले !

‘महारेरा’ने (महाराष्‍ट्र रिअल इस्‍टेट नियामक प्राधिककरण) हानीभरपाईसाठी आतापर्यंत ४४२ प्रकल्‍पांतील ७०५ कोटी रुपयांच्‍या वसुलीसाठी १ सहस्र १६३ वॉरंट (नोटीस) बांधकाम व्‍यावसायिकांना पाठवली आहेत.

पोलीस भरतीसाठी साहाय्‍य करण्‍याचे आमीष दाखवून तरुणीवर अत्‍याचार !

साहाय्‍याच्‍या नावाखाली गैरफायदा घेणार्‍यांपासून स्‍वत:चे रक्षण करण्‍यासाठी स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आणि मनोबल वाढवण्‍यासाठी धर्माचरण करणे आवश्‍यक !