विनापरवाना प्रचाराचा ‘एअर बलून’ लावल्याने हॉटेलमालकावर गुन्हा नोंद !

फुरसुंगी येथील लॉजच्या गच्चीवर पुरंदर विधानसभा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांचा शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण असलेला ‘एअर बलून’ (हवा असलेला मोठा फुगा) लावून आचारसंहिता भंग केल्याबद्दल हॉटेलमालक अक्षय पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यंदा आळंदी येथे १५० वर्षे जुन्या रथातून होणार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा रथोत्सव !

सप्त शतकोत्तर वर्षाचे औचित्य साधून भाविकांना यंदा कार्तिक वारी सोहळ्यात माऊलींच्या रथोत्सवात प्राचीन असलेला १५० वर्षे जुना लाकडी रथ पहाता येणार आहे.

पिंपरी (पुणे) येथे मतदारांनी नेत्यांसमोर फलकाद्वारे उपस्थित केले प्रश्न आणि समस्या !

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ (एम्.आय.डी.सी.) बळकट करण्यासाठी तुम्ही काय केले ? वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय केले ? जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत किती लक्षवेधी मांडल्या ?

बोपदेव घाट प्रकरणातील आरोपींनी केली पोलिसांची दिशाभूल !

यातून आरोपींची वृत्ती लक्षात येते. त्यांचे पुन्हा अशी कृती करण्याचे धाडस होणार नाही, अशी कठोर शिक्षा त्यांना होणे आवश्यक आहे !

लोणी काळभोर (पुणे) येथे विवाहितेशी लगट करणार्‍या धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद !

धर्मांध सहजतेने मुली आणि विवाहित महिला यांची छेड काढतात, यावरून त्यांना पोलीस आणि कायदा यांचा कोणताही धाक नाही, हे लक्षात येते. पोलीस धर्मांधांना वठणीवर कधी आणणार ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दक्षिण मुंबईत सव्वा दोन कोटी रुपयांची रक्कम जप्त !; सत्ताधार्‍यांकडून कोट्यवधींच्या उधळपट्टीचा आरोप !…

मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील व्यवसायिकाच्या ठिकाणी केलेल्या कारवाईत सव्वा दोन कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांच्या कह्यात देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील २ कर्मचार्‍यांना लाच घेतांना अटक !

साध्या कामांपासून ते मोठी कामे करण्यासाठी लाच घेणार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवणे आवश्यक !

पुणे विभागामध्ये २४ लाख रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ हस्तगत !

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍यांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांची दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत, असेच सर्वसामान्य जनतेला वाटते !

लाच स्वीकारतांना साहाय्यक फौजदार आणि ‘ट्रॅफिक वॉर्डन’ यांच्यावर गुन्हा नोेंद !

पोलीस खात्यातील तळागाळापर्यंत मुरलेला भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षा हाच एकमेव पर्याय !