पुणे येथील उमामहेश्वर मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम !
पुणे – केवळ आर्थिक प्राप्तीसाठी नवीन मंदिरे उभारण्यापेक्षा मोठी परंपरा असलेल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन करणे, हे मोठे कार्य असल्याचे प्रतिपादन मन्मथधाम संस्थान, कपिलधार येथील सद्गुरु डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य यांनी केले. डॉ. शिवाचार्य यांच्या समवेत ‘सतसमाज सत्मार्गी आखाड्या’चे आंतरराष्ट्रीय महामंडलेश्वर श्री श्री १००८ रामनगिरि गुरु मौनगिरिजी महाराज, श्री क्षेत्र मुखेड येथील ष. ब्र. १०८ विरूपाक्ष शिवाचार्य आणि महंत १०८ श्री जनेश्वरानंद गिरीजी महाराज या विभूतींच्या हस्ते राजा केळकर संग्रहालयासमोर असलेल्या उमामहेश्वर मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. मंदिराचे व्यावसायिकरण, ही समाजातील मोठी शोकांतिका असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला उपस्थित अन्य महंतगणांनीही मार्गदर्शन केले.