‘बटेंगे तो कटेंगे’ ही पक्षाची भूमिका नाही ! – पंकजा मुंडे, आमदार, भाजप

‘बटेंगे तो कटेंगे’ हे काय सूत्र आहे का ? असे संदेश कुणीही  सामाजिक माध्यमांवर टाकतो. ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. कुणीही जाती-धर्माचे राजकारण करू नये. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जात आहोत….

दौंड (पुणे) येथे गोरक्षकांनी केलेल्या कारवाईत १६ बैलांची सुटका !

गोवंश हत्याबंदी कायद्याचा काही उपयोग आहे कि नाही ?

रावेत (पुणे) येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मोटारचालकाला अटक !

अपघातानंतर मोटारचालक आदित्य हा घटनास्थळी न थांबता गाडीसह पसार झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेत पोलिसांनी परिसरातील ८० सीसीटीव्हींचे चित्रीकरण पडताळले. त्यातून आरोपीचा शोध लागला.

पुणे विमानतळावरील विविध विमानांमध्ये बाँब ठेवल्याची अफवा !

बाँब ठेवल्याची अफवा पसरवणार्‍यांना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !

गोव्यामध्ये गांजा विक्रीसाठी निघालेल्या २ धर्मांधांना अटक !

धुळे जिल्ह्यातून शिरपूर येथून दोघे एस्.टी. बसमधून गांजा घेऊन गोव्यात विक्रीसाठी निघाल्याची माहिती खडकी पोलिसांना समजली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून चर्च चौकामध्ये दोघांना अटक केली.

जुन्नर (पुणे) येथे लक्ष्मीपूजनादिनी ६ गोवंशियांची सुटका !

गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ? हिंदूंच्या पवित्र लक्ष्मीपूजनादिनी गोवंशांची हत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे !

दिवाळीच्या रात्री फटाके फोडणार्‍या व्यक्तीला भरधाव चारचाकीची धडक !

घायाळाला कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात नेले असून तिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रणही समोर आले आहे.

दिवाळीनंतर पुणे आणि मुंबई या शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली !

पुणे शहरातील हडपसर भागात तर हवा धोकादायक पातळीवर पोचली आहे. यामुळे नागरिकांचे श्वसनाचे आजार बळावण्याचा धोका आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अर्ज मागे घेण्याची मुदत संपली !; राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने सरवणकर निवडणूक लढवणार !…

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेण्याचा ४ नोव्हेंबर हा अखेरचा दिवस होता. ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. ही मुदत आता संपली आहे.

कार्तिकी वारी जवळ येत असतांना इंद्रायणी नदी ऐन दीपावलीत प्रदूषणाच्या विळख्यात !

प्रशासनाच्या लेखी वारकर्‍यांच्या भावनांची किंमत शून्य आहे का ? तसेच एरव्ही हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाची ओरड करणारे पुरो(अधो)गामी, तथाकथित पर्यावरणप्रेमी आता कुठे आहेत ?