पिंपरी-चिंचवड – पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे खटले पुढील काही दिवसांत न्यायालयात पाठवले जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त बाबू बांगर यांनी दिली. धुळवडीचा सण साजरा होत असतांना काही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. वाहतूक पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली होती. पोलीस आयुक्तालयातील २५ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. सांगवी वाहतूक विभाग ते तळवडे, देहू रोड, तळेगाव, रावेत, हिंजवडी, वाकड, भोसरी, चिंचवड अशा प्रत्येक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. पुढील कारवाई न्यायालयाकडून होईल, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त बांगर यांनी दिली.
संपादकीय भूमिकाआजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! |