राष्ट्रीय काँग्रेसच्या युवकांची पदयात्रा पुण्यातच रोखली !

यात्रेसाठी अनुमती नसल्याचे पोलिसांचे म्हणणे

पुणे – राष्ट्रीय काँग्रेसच्या युवकांची लाल महाल ते विधानसभा अशी पदयात्रा शिवाजीनगर बसस्थानकाच्या चौकापर्यंत आल्यानंतर तिथेच अडवण्यात आली. अनुमती नाकारण्यात आली असल्यामुळे पुढे जाता येणार नाही’, असे सांगत पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले. त्यांना पुढे जाऊ दिले नाही. पदयात्रेसाठी लाल महालाजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुपारी ४ वाजेपर्यंत जमा होत होते. विविध भागांतून यात्रेसाठी कार्यकर्ते आले होते. मुंबईपर्यंतच्या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी त्यात युवक काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते सहभागी होणार होते.

प्रदेश सरचिटणीस जैन म्हणाले, ‘‘अनुमती नाकारायची होती, तर आम्ही ३-४ दिवसांपूर्वी अनुमती मागितली, तेव्हाच नकार द्यायचा होता. आता अनुमती नाकारणे म्हणजे पोलिसांची ही हुकूमशाही आहे.