पानीपत (हरियाणा) येथे मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार ! – जयकुमार रावल, राजशिष्टाचारमंत्री
पानीपतच्या युद्धात मराठा युद्धवीरांनी दाखवलेल्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार आहे. तेथील ‘कालाअंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारले जाईल, अशी माहिती राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.