डेहराडून (उत्तराखंड) येथील डॉ. कुलदीप दत्ता (वय ७५ वर्षे) हे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ आहेत. त्यांनी वर्ष १९७६ ते १९९८ या काळात उत्तरप्रदेशामध्ये ‘वैद्यकीय संचालक’ म्हणून सरकारी नोकरी केली. त्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्यांनी इंद्रेश वैद्यकीय महाविद्यालय आणि आर्.जी. स्टोन यांच्यासमवेत काम केले. ‘शाश्वत भारत ट्रस्ट’चे ते अध्यक्ष आहेत.

१. ‘शाश्वत भारत ट्रस्ट’चा उद्देश
‘शाश्वत भारत ट्रस्ट’च्या अंतर्गत सनातन संस्कृतीचे सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ‘शाश्वत भारत’च्या वतीने हिंदूंच्या धार्मिक परंपरा आणि धार्मिक जीवनशैली यांच्याविषयी मार्गदर्शन करण्यात येते. गेल्या शतकात शाश्वत सनातन संस्कृतीचा विध्वंस करण्यात आला. अनेक आक्रमणे होऊनही सनातन धर्माच्या या विशाल वृक्षाने सर्वांना अनादी काळापासून आश्रय दिला आहे. ‘शाश्वत भारत ट्रस्ट’च्या माध्यमातून सर्व आवश्यक साधनांचा वापर करून या दिव्य वृक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
विशेष सदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल ! – संपादक
२. ‘शाश्वत भारत संवाद’ परिषदेचे आयोजन
‘शाश्वत भारत’च्या वतीने आतापर्यंत २ परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शाश्वत भारत संवाद’ हा एक दिवसाचा उपक्रम असतो. या ‘शाश्वत भारत संवाद’मध्ये राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील आघातांसंदर्भात मान्यवरांशी चर्चा करण्यात येते.
आपल्याकडे उत्तराखंडमधील लोकसंख्येमध्ये लक्षणीय पालट झाला आहे. बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत आहे. त्यांच्यामुळे अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण केला आहे. हिंदूंची श्रद्धास्थाने डोंगराळ भागात आहेत. चारधामही पर्वतरांगांमध्येच आहेत. तिथे आतापर्यंत कोणत्याही आक्रमकाने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला नव्हता. आता मात्र या पर्वतीय भागातील लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. त्यामुळे या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्रीयपणे सहभागी होण्यासाठी योजना आखणे, यांविषयी ‘शाश्वत भारत ट्रस्ट’च्या वतीने जागृती करण्यात येते.
३. व्याख्यानांच्या माध्यमातून जागृती
‘शाश्वत भारत ट्रस्ट’च्या माध्यमातून व्याख्यानेही घेण्यात येतात. या व्याख्यानांमध्ये सनातन संस्कृतीची महती आणि वैदिक परंपरांविषयी जागृती करण्यात येते. पंजाब, हरियाणा, देहली या परिसरात अनेक परकीय आक्रमणे झाल्याने तिथे १०० वर्षांपेक्षा जुने एकही मंदिर नाही. आता हिमालयीन पर्वतरांगांमध्ये लोकसंख्या वाढवून हिंदूंची चारधामसारखी प्राचीन धार्मिक स्थळे कह्यात घेण्याचे नियोजित षड्यंत्र राबवले जात आहे. ‘मुसलमानांचा जन्मदर ४.८ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांवर आला आहे’, असे सांगितले जाते, तर मुसलमान लोकसंख्या कशी वाढत आहे ? बाहेरून येणार्या मुसलमानांमुळे भारतातील मुसलमान लोकसंख्या वाढत आहे. याविषयी लोकांमध्ये जागृती वार्षिक परिषद, मासिक व्याख्याने या माध्यमांतून केली जाते.

४. हिंदुत्वाच्या कार्याकडे कसे वळले ?
डॉ. कुलदीप दत्ता यांच्या आईच्या माहेरचे नातेवाईक पाकिस्तानातील सियालकोट येथे रहात असत. वर्ष १९४७ मध्ये झालेल्या फाळणीच्या काळात अनेक अत्याचार सोसून ते जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झाले. वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून काश्मिरी हिंदूंचा जो वंशविच्छेद करण्यात आला, त्या वेळी ते नातेवाईक त्यातही भरडले गेले, तसेच त्यांच्या काकूचे नातेवाईकही जम्मू-काश्मीरमध्येच वास्तव्य करत होते. डॉ. दत्ता यांना जेव्हा ‘आपल्या नातेवाइकांना जिहादी आतंकवादामुळे काय सोसावे लागले’, हे समजले, तेव्हा त्यांनी हिंदुत्वाच्या कार्याविषयी जागृती करण्याचे ठरवले.