CM Yogi On Ram Navami : श्रीरामनवमीनिमित्त उत्तरप्रदेशातील प्रत्येक मंदिरात श्री रामचरितमानसचे पठण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निर्देश  

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशात श्रीरामनवमीनिमित्त सर्व मंदिरांमध्ये २४ घंटे श्री रामचरितमानसाचे अखंड पठण केले जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले होते.

१. मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसार सर्व जिल्ह्यांतील मंदिरांमध्ये श्री रामचरितमानसाचे अखंड पठण करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

२. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ५ एप्रिल या दिवशी प्रारंभ होणार्‍या अखंड श्री रामचरितमानस पाठाची समाप्ती ६ एप्रिल या श्रीरामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिरात श्री रामलल्लाच्या माथ्यावर पाडण्यात येणार्‍या सूर्यकिरणांद्वारे होणार आहे.

३. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, देवीपाटन मंदिर, बलरामपूर, शाकुंभरी देवी मंदिर – सहारनपूर, श्री विंध्यवासिनी देवी धाम – मिर्झापूर इत्यादी प्रमुख देवी मंदिरे आणि शक्तिपीठे यांमध्ये मोठ्या संख्येने भाविक येतील. सूर्यकिरणाच्या दर्शनासाठी देशभरातून लोक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या सर्व व्यवस्था केल्या पाहिजेत. रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना कडक उन्हात उभे रहातांना अडचणी येऊ नयेत; म्हणून मार्गावर ज्यूट पासून बनवलेले कापड घालण्याची व्यवस्था करावी. सर्व मंदिरांमध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था असावी.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या राज्यांत असे निर्देश देऊ शकतात, तर अन्य राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यांत का देऊ शकत नाहीत ?, असा प्रश्न अशांना निवडून देणार्‍या धर्माभिमानी हिंदूंना पडतो !