सोलापूर येथील नई जिंदगी परिसरात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांचे आक्रमण

नई जिंदगी परिसरात २७ मे या दिवशी तंबाखू आणि मावा बनवून त्याची विक्री करणारा अब्दुल हमीद अब्दुल करीम सय्यद आणि त्याच्या सहकार्‍यांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर आक्रमण करून एका पोलिसाचा भ्रमणभाष हिसकावून घेतला.

परभणी येथे जुगार खेळणार्‍या प्रतिष्ठित ११ व्यापार्‍यांसह नगरसेविकेच्या मुलाला अटक

येथील एका बंद दाल मिलच्या आवारात चालू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी २७ मेच्या रात्री धाड टाकून ११ प्रतिष्ठित व्यापार्‍यांसह भाजप नगरसेविकेच्या मुलाला अटक केली.

राज्य राखीव पोलीस दलातील १४ जणांना ‘कोरोना’ची लागण

मुंबईतील घाटकोपर येथे बंदोबस्ताला गेलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील ‘सी कंपनी’च्या १४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना महापालिकेच्या ‘क्वारंटाइन सेंटर’मध्ये ठेवले आहे. या ‘कंपनी’तील १०० पोलिसांची तुकडी मुंबई येथे बंदोबस्तासाठी गेली होती.

इन्स्टाग्रामवर आत्महत्येचा संदेश पाठवणार्‍या तरुणीला पोलिसांनी आत्महत्येपासून परावृत्त केले

इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमावर एका युवतीने आत्महत्या करत असल्याचा संदेश पाठवला. हा संदेश वाचून महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सायबर सेलमधील तज्ञांकडून संदेश पाठवणार्‍या मुलीच्या खात्याची सविस्तर माहिती मिळवली.

ठाणे येथील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये २ विशेष पोलीस उपायुक्तांची नियुक्ती

प्रतिबंधित क्षेत्रांच्या परिसरातील कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी ठाणे येथे दीपक देवराज, तर वागळे इस्टेट येथे संजय जाधव या २ अतिरिक्त पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते या परिमंडळातील अनुमाने २५० प्रतिबंधित क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत.

दळणवळण बंदीच्या काळात कायदा मोडल्याच्या प्रकरणी महाराष्ट्रात १ लाख १४ सहस्र गुन्हे नोंद

२२ मार्च ते २४ मे या दळणवळण बंदीच्या काळात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कायद्याचे उल्लंघन करणार्‍या महाराष्ट्रातील १ लाख १४ सहस्र जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

श्री ष.ब्र.१०८ सद्गुरु निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांची हत्या करणार्‍या आरोपीस ५ दिवसांची पोलीस कोठडी

जिल्ह्यात उमरी तालुक्यातील नागठाणा बुद्रुक येथे २३ मेच्या रात्री श्री ष.ब्र.१०८ सद्गुरु निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांच्यासह त्यांच्या एका सेवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी उमरी पोलिसांनी आरोपी साईनाथ लिंगाडे याला अटक केली आहे.

दळणवळण बंदीच्या काळात जुन्नर (पुणे) येथे पाण्याच्या जारमधून गोमांसाची विक्री

दळणवळण बंदी असतांना जुन्नरमध्ये गोमांस विक्री केल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी कादिर मुस्तका कुरेशी, शाहरूख रहेमान बेपारी, शाबीर मुस्तका कुरेशी आणि बाबू रहेमान बेपारी या ४ जणांवर गुन्हे नोंद केले आहेत.

प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस कल्याण अधिकारी नेमणार

बरेच पोलीस कर्मचारी आजारी पडल्यानंतर योग्य उपचार न घेता आजार अंगावर काढत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना योग्य आरोग्य सेवा मिळण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांनी पोलीस कल्याण अधिकारी नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या संकटकाळात ‘विशेष पोलीस अधिकारी’ संकल्पना पोलिसांकरवीच राबवणारे आणि समाजसेवेत अविरत कार्यरत असलेले पुणे येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता सत्येंद्र मुळे !

समाजातील लोकांच्या सुख-दुःखाशी समरस होऊन त्यांना सर्वतोपरी साहाय्य करणारे आणि वेळप्रसंगी कायद्याचा धाक दाखवणारे अधिवक्ता सत्येंद्र मुळे !