
ढाका – बांगलादेश पोलिसांनी इंटरपोलला माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावण्याची विनंती केली आहे. त्यांच्यासह इतर ११ जणांच्या विरोधातही ही प्रक्रिया करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘इंटरपोल’ ही पोलिसांची जगातील सर्वांत मोठी संघटना आहे. ही संघटना जगभरातील विविध देशांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास साहाय्य करणे, तसेच संबंधित देशातून इतर देशांत पसार झालेल्या गुन्हेगारांविषयी माहिती पुरवणे आदी कार्य करते. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस म्हणजे अटक वॉरंट नव्हे, तर एखाद्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी केलेली विनंती असते.
🚨 Bangladesh seeks Interpol Red Corner Notice against ex-PM Sheikh Hasina!
Hasina fled to India on Aug 5, 2024, following massive student protests that ended her 16-year Awami League rule.🔴#Yunus #SheikhHasinapic.twitter.com/WlIgeaMHji
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 21, 2025
१. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या सत्तापालटापासून शेख हसीना भारतात रहात आहेत. शेख हसीना, तसेच त्यांचे सहकारी यांच्यावर मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि नरसंहाराचे आरोप होते.
२. बांगलादेशानेही भारताला हसीना यांना हद्दपार करण्याचे आवाहन केले आहे. तथापि भारत सरकारने त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवून दिली आहे आणि त्यांना बांगलादेशाला पाठवले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.