रा.स्व. संघाच्या ‘विश्व संवाद केंद्रा’चे शिबिर

अनुसूचित जातींमधील ज्या लोकांनी ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म स्वीकारला आहे, अशा लोकांना आरक्षणाचे लाभ मिळावेत कि नाही? या विषयावर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘विश्व संवाद केंद्र’ या विभागाचे २ दिवसांचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाद्र्याला अटक !

बाटगे ख्रिस्ती हे धर्मांतर करूनही हिंदु नावे धारण करतात. असे केल्याने त्यांना हिंदु समाजात मिसळून हिंदूंचा बुद्धीभेद करणे सोपे जाते, हे जाणा !

पुरोगाम्यांचे संधीसाधू गोप्रेम !

पुरोगाम्यांचा दिशाहीन विरोध ! कणेरी मठाच्या गोशाळेत गायींचा मृत्यू झाल्यामुळे सुस्तावलेल्या पुरोगाम्यांमध्ये नवउत्साह संचारला आणि गोप्रेमाची झूल पांघरून त्यांनी मठाच्या विरोधात आगपाखड करण्यास आरंभ केला. पशूप्रेमी किंवा गोप्रेमी यांची सहानुभूती मिळवण्याचा ओंगळवाणा प्रयत्न पुरोगाम्यांकडून होत असून हिंदु जनतेकडे त्यांची डाळ शिजणार नाही, हेही तितकेच खरे !

नगर येथे शिवजयंती साजरी केली म्हणून ११ धर्मांधांकडून हिंदु युवकाला मारहाण !

असे व्हायला नगर भारतात आहे कि पाकमध्ये ? धर्मांधांच्या या मुजोरीविषयी आता कुणीच का बोलत नाही ? अशांना तात्काळ अटक होऊन कठोर शिक्षा होण्यासाठी समस्त हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !

समाजवादी पक्षाने माफियांचे पोषण केले; मात्र आम्ही माफियांना नष्ट करू ! – योगी आदित्यनाथ

राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेल पाल याच्या हत्येवरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी विधानसभेत केला होता. त्याच्या उत्तरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.

कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षड्यंत्र आहे का ? याची चौकशी व्हावी ! – हिंदु जनजागृती समिती

या दुर्घटनेच्या निमित्ताने प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी आणि कणेरी मठ यांची अपकीर्ती केली जात आहे. त्यामुळे कणेरी मठातील गायींच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यामागील षड्यंत्र उघड करायला हवे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संपूर्ण हिंदु समाज कणेरी मठाच्या पाठीमागे उभा आहे.

कोरेगावच्या नवीन शहर विकास आराखड्याविरोधात कडकडीत बंद !

नवीन शहर विकास आराखड्यास नागरिकांसह शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे ‘कोरेगाव बचाव संघर्ष समिती’ने ‘कोरेगाव बंद’ची जाहीर हाक दिली होती.

अमेरिकी ‘ज्‍यूं’कडून शिका !

महासत्ता होण्‍यासाठी अमेरिकेच्‍या आत्‍मकेंद्रित नि धूर्त धोरणाची ‘री’ ओढणे भारताला निश्‍चितच शोभेचे नाही; पण भारताच्‍या हितामध्‍ये अमेरिकेला नमवणे, हे तेथील भारतियांच्‍या हातात आहे. भारताच्‍या महासत्ता होण्‍याच्‍या प्रवासात अमेरिकेतील भारतियांनी दबावगट बनवणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते !

गोवा येथील आग्वाद किल्ला संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र बंद

मद्यविक्रीचे केंद्र विरोधानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे ते चालू कसे झाले ? आणि त्याविषयी प्रशासनाला ठाऊक नव्हते कि दुर्लक्ष केले गेले ? हे जनतेला समजले पाहिजे !

जे.एन्.यू.ला टाळे ठोका !

नवी देहलीतील जे.एन्.यू. विश्वविद्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यास विरोध करत साम्यवादी विद्यार्थी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यानी छत्रपतींच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे.