कोरेगावच्या नवीन शहर विकास आराखड्याविरोधात कडकडीत बंद !

सातारा, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरेगाव नगरपंचायतीने जानेवारी मासाच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केलेल्या नवीन शहर विकास आराखड्यास नागरिकांसह शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. याविषयी २० फेब्रुवारी या दिवशी ‘कोरेगाव बचाव संघर्ष समिती’ने ‘कोरेगाव बंद’ची जाहीर हाक दिली होती. या बंदला नागरिक, व्यापारी, शेतकरी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.

 (सौजन्य : News State Maharashtra Goa)

‘कोरेगाव बचाव संघर्ष समिती’च्या वतीने आतापर्यंत प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. नंतर ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले होते. नंतर लाक्षणिक उपोषण करण्यात आले; मात्र सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यानंतर २० फेब्रुवारी या दिवशी ‘कोरेगाव बंद’ची हाक देण्यात आली. सोमवार आठवडी बाजाराचा वार असूनही अत्यावश्यक सेवा वगळता ‘कोरेगाव बंद’ला सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.