AJMER DARGA : अजमेर दर्ग्याच्या सर्वेक्षणाच्या मागणीची याचिका न्यायालयाने स्वीकारली !

अजमेर दर्गा

अजमेर (राजस्थान) – येथील अजमेर दर्ग्याचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली असून आता यावर २० डिसेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे. तसेच अल्पसंख्यांक मंत्रालय, अजमेर दर्गा समिती आणि पुरातत्व विभाग यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अजमेर दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी भगवान शिवाचे विशाल मंदिर होते. तेथे जलाभिषेक होत असे, असे या याचिकेत सांगण्यात आले आहे. हिंदु पक्षाने यासाठी वर्ष १९११ मध्ये लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. दर्ग्यात असलेल्या वास्तू जुन्या मंदिराचा भाग असून तळघरात एक गर्भगृह असल्याचे हिंदू पक्षाने म्हटले आहे. हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी ही याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.