अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहद यांचा विवाह अनधिकृत – मौलाना शहाबुद्दीन

बरेली येथील मौलाना शहाबुद्दीन म्हणाले की, ‘शरीयत-ए-एलामिया’नुसार इस्लाम न स्वीकारणार्‍या मुसलमानेतर मुलीचा मुसलमान मुलाशी विवाह अधिकृत मानला जात नाही.

शिवालयात पूजा करतांनाच्या छायाचित्रांमुळे अभिनेत्री सारा अली खान यांच्याविषयी मुसलमानांना पोटशूळ !

हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे धडे देणारे गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासारखे मुसलमान अशा प्रकरणांत मात्र मौन बाळगतात, हे जाणा !

(म्हणे) ‘भारतात सर्व जण उपाशी मरत आहेत, तू तेथे परत का जात नाहीस ?’- अमेरिकी लेखिका एन्. कोल्टर

ही आहे अमेरिकी लोकांची मानसिकता ! असे अमेरिकी भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचा कांगावा करत असतात !

जॉर्ज सोरोस यांना वाटते की, जग त्यांच्या विचारांनुसार चालते ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रत्युत्तर

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या जॉर्ज सोरोस यांनी ‘भारतातील उद्योगपती अदानी यांच्यावर आरोपांच्या प्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर द्यावे लागेल’, असे विधान केले होते.

संग्रहालयाचे पावित्र्य नष्ट व्हावे, यासाठी कुणालाही अनुमती दिलेली नाही ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकाने उघडले असल्याने स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्याकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. मद्यविक्रीचे दुकान बंद न केल्यास सत्याग्रहाला आरंभ करण्याची चेतावणी दिली आहे.

शिबिरासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उपस्थिती लावण्याचा आदेश मागे घ्यावा ! – काँग्रेस

काँग्रेसला पोटशूळ ! भाजप सरकार गोव्यातील पारंपरिक कार्निव्हल महोत्सवाला आळा घालत आहे आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्या शिबिराला शिक्षक, ‘एन्.सी.सी.’, ‘एन्.एस्.एस्.’ आणि ‘स्काऊट अँड गाईड’ स्वयंसेवक यांना बंधनकारक करत आहे.

पुणे येथील भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग खरे नसल्याचा आसाम सरकारचा दावा !

आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर हे देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे सहावे ज्योतिर्लिंग आहे; मात्र ‘भीमाशंकरचे ज्योर्तिलिंग हे खरे नसून आसाममधील ज्योतिर्लिंग खरे आहे’, असा दावा आसाम सरकारने केला आहे.

ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकाला राणी कॅमिला कोहीनूर हिरा असलेला मुकुट घालणार नाहीत !

भारतियांनी आणि भारत सरकारने आता हा हिरा भारतात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

कॅनडातील श्रीराम मंदिराची तोडफोड

कॅनडामध्ये खलिस्तान्यांचा सुळसुळाट झाला असून त्याला तेथील सरकारचे अभय आहे. याकडे आता भारत सरकारला विशेष लक्ष देऊन अशा घटना रोखण्यासाठी आणि खलिस्तानवाद्यांवर लगाम लावण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील !

(म्हणे) ‘बंगालच्या सीमा भागात सीमा सुरक्षा दलाने दहशत माजवली आहे !’ –  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

सीमेचे रक्षण करणार्‍या एका दलावर अशा प्रकारचा आरोप केवळ राष्ट्रघातकीच करू शकतात ! अशा आरोपातून ममता बॅनर्जी यांची मानसिकता लक्षात येते ! यासाठीच बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावणे आवश्यक आहे !