शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पाठिंबा !
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपला देण्याविषयी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय मान्य असेल, असे घोषित केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देहली येथे भेट घेऊन भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे अंतिम झाले आहे. सध्या तरी भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमावर आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होण्याची शक्यता आहे.