विधानसभा निवडणुकीतील निकालाच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार ! – विक्रम सावंत, माजी आमदार

विक्रम सावंत, माजी आमदार

जत (जिल्हा सांगली), २७ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यातील विधानसभेचे निकाल धक्कादायक आणि संशयास्पद आहेत. महायुतीने केंद्रातील सत्तेचा अपवापर केला आहे. हा निकाल सर्वसामान्यांसह आम्हालाही मान्य नाही. या निवडणुकीत महायुतीने लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम केले आहे, असा आरोप येथील माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी केला, तसेच या निकालाच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात येईल, असेही त्यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

विक्रमसिंह सावंत पुढे म्हणाले की, महायुतीच्या उमेदवारांना लाखांहून अधिक मते, तर ३६ सहस्रांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. हे सारे संशयास्पद आहे. जत शहरासह तालुक्यातील ६७ गावांत मताधिक्य १०० टक्के मिळणे अपेक्षित असतांना अवघ्या ६ गावांत किरकोळ मताधिक्य मिळाले आहे.