इस्रायलने आमच्या सैनिकांना सोडल्यास आम्हीही इस्रायली ओलिसांना सोडू ! – हमास
हिजबुल्लाप्रमाणे हमासही आता युद्धविरामासाठी सिद्ध झाला आहे. हमासच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, आम्ही इजिप्त, कतार आणि तुर्कीये या देशांच्या मध्यस्थांना कळवले आहे की, आम्ही इस्रायलशी युद्धविराम, तसेच बंदीवानांचे परस्पर प्रत्यार्पण, हे करार करण्यास सिद्ध आहोत.