(म्हणे) ‘हिंदु राष्ट्रचा आग्रह धरणे म्हणजे कायदाद्रोह !’ – रियाझ फरंगीपेठ, सोशल डेमोक्रॅटिक ऑफ इंडियाचे नेते

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. त्याला कायदाद्रोह म्हणणे हाच कायदाद्रोह आहे !

राहुल गांधी यांचे आतंकवाद्यांशी संबंध !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे केंब्रिज, इंग्लंड येथे झालेले व्याख्यान हे ‘मेड इन चायना’ (चीनने तयार केलेले) असल्याचे भासते. चीनचे कौतुक आणि भारतावर टीका करणारे भाषण म्हणजे भारतीय लोकशाहीवरील एक आक्रमण !

व्हिडिओ पहा : जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या कार्यालयाबाहेर भारतविरोधी फलक !

भारताची जाणीवपूर्वक अपकीर्ती करण्यासाठी रचलेल्या षड्यंत्राचाच हा एक भाग असल्याचे लक्षात येते ! भारताने यामागील लोकांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर उघड करणे आवश्यक आहे !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये होळी खेळण्यावर बंदी !

जर हिंदूंच्या सणावर बंदी घालायची असेल, तर अन्य धर्मियांच्या सणांवर ती घातली पाहिजे ! नावात ‘हिंदु’ शब्द असतांना याउलट नियम विश्‍वविद्यालयाकडून घातला जात असेल, तर त्याला विरोध होणारच !

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात होळीच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी आदेश लागू

काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट ! आणखी किती दिवस हिंदू राजस्थानमध्ये काँग्रेसला राज्य करू देणार आहेत ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कधी अशी बंदी घातली जाते का ?

अल्पसंख्यांकांची ढाल आणि योगींची कारवाई !

‘दुष्टांना दाखवलेला मानवतावाद हा नेहमी सज्जनांच्या जिवावर उठतो’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांचे हितसंबंधी यांना मानवता दाखवण्याऐवजी ते ज्यांना पीडित करतात, त्यांना दाखवणे योग्य नाही का ?

‘श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवास’ विरोध करणारे डावे, पुरोगामी यांचा फज्जा : महोत्सवास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद !

हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलकांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याने त्यांना उद्देशून देशद्रोही म्हटले ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची सिद्धता केल्यानंतर विरोधकही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

माझ्या भ्रमणभाषची हेरगिरी केली जाते ! – राहुल गांधी यांचा केंब्रिज विश्‍वविद्यालयात दावा

भारतीय राज्यघटनेत भारताला राज्यांचा संघ म्हटले आहे. त्या संघाशी चर्चा आवश्यक आहे. आता हा संवादच संकटात सापडला आहे. विरोधी पक्षांचे नेते काही सूत्रांवर चर्चा करत होते. त्यांना कारागृहात डांबले. असे ३-४ वेळा झाले. ते अत्यंत हिंसक होते.

(म्हणे) शेजारील देशाला होत असलेल्या शस्त्रपुरठ्यामुळे दक्षिण आशियात अस्थिरता ! – पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार

गेली अनेक दशके अमेरिकेकडून पाकला होत असलेल्या शस्त्रपुरवठ्यामुळे ही अस्थिरता निर्माण होत नव्हती का ?