वाढती लाचखोरी : कठोर उपाययोजना कधी ?
राज्यात विविध न्यायालयांत चालू असलेले लाचखोरी आणि इतर भ्रष्टाचाराचे ९३ खटले या वर्षात निकाली निघाले; मात्र यातील केवळ ९ गुन्ह्यांतच १३ आरोपींना शिक्षा झाली. इतक्या अल्प प्रमाणात जर शिक्षा होत असेल, तर शिक्षेचा धाक कसा रहाणार ?