प्रत्येक क्षेत्रात स्वदेशीची भावना जागृत करणे आवश्यक !
‘स्वदेशी भावना’ स्वभाव बनली पाहिजे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात स्वदेशी चळवळ चालू झाली. तेव्हा तिचे स्वरूप काही प्रमाणात प्रतिक्रियात्मक होते. आता आपल्याला पुन्हा त्या दिशेने वळावे लागेल.
‘स्वदेशी भावना’ स्वभाव बनली पाहिजे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात स्वदेशी चळवळ चालू झाली. तेव्हा तिचे स्वरूप काही प्रमाणात प्रतिक्रियात्मक होते. आता आपल्याला पुन्हा त्या दिशेने वळावे लागेल.
स्वदेशी परंपरांवर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे उचलून त्यांना विकसित केले, तर काय चमत्कार होऊ शकतो, हे मोदी आणि सैनिक यांनी सिद्ध करून दाखवले आहे ! येणार्या काळात प्रत्येक क्षेत्र अशा आत्मनिर्भरतेने भरून जाईल, यात शंकाच नाही !
अनेक प्रमुख व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी आता ‘गूगल’ अन् ‘मायक्रोसॉफ्ट’ यांसारख्या अमेरिकन आस्थापनांकडून प्रदान केलेल्या सेवांऐवजी स्वदेशी आस्थापन ‘झोहो’च्या उत्पादनांकडे वळत आहेत.
आत्मनिर्भर भारत, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि महिलांसाठी रोजगाराची संधी या हेतूने दिवाळीच्या निमित्ताने वांद्रे येथील ‘महापारेषण’च्या (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड) कार्यालयामध्ये विविध स्वदेशी उत्पादनांचे कक्ष उभारण्यात आले होते.
दिवाळीची खरेदी करतांना हिंदूंना हिंदु व्यापारी सहज ओळखता यावेत, यासाठी येथील कापड बाजार भगव्या ध्वजांनी सजला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी ‘हिंदूंनी दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करावी’, असे आवाहन केले होते.
हिंदु समाजाच्या संघटित स्वरूपातच भारताची एकात्मता, विकास आणि सुरक्षेची हमी आहे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात ते बोलत होते.
भारतीय अर्थव्यवस्थेचे अन्य देशांवरील अवलंबित्व अल्प करण्यासाठी जनतेने केवळ २ ऑक्टोबरलाच नव्हे, तर प्रतिदिनच स्वदेशीचा अंगीकार करणे अपेक्षित आहे !
हा जीएसटी महोत्सव नागरिकांची बचत वाढवेल आणि त्यांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी करता येईल, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी २१ सप्टेंबरला राष्ट्राला उद्देशून केलेल्या मार्गदर्शनात केले.
जेव्हा भारतीय उत्पादनांचा वापर वाढेल, तेव्हा रोजगाराच्या संधी तर निर्माण होतीलच, याखेरीज परकीय आयातीवरील अवलंबित्वही अल्प होईल. कुणीही गुंतवणूक केली, तरी उत्पादन भारतीय असले पाहिजे आणि हाच ‘स्वदेशी मंत्र’ आहे.
आज तरुण पिढी पिझ्झा, बर्गर, शीतपेये इत्यादी आरोग्यास हानिकारक असलेल्या पदार्थांच्या आहारी गेली आहे. त्यांचे प्रबोधन करून सर्वांना स्वदेशी वस्तूंकडे वळवणे आवश्यक आहे.