विमानात धूम्रपान करणारा प्रवासी अटकेत !

जयपूर-मुंबई विमान प्रवासात धूम्रपान करतांना प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अर्जुन राम ठालोर (वय ३४ वर्षे) असे त्याचे नाव असून तो राजस्थान येथील रहिवासी आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Re-Polling In Karnataka : कर्नाटकात २ गटांतील हाणामारीमुळे पुर्नमतदान ! 

एक गट मतदानाच्या बाजूने होता, तर दुसरा गट बहिष्कार घालण्याची मागणी करत होता. यावरून या गटांत हाणामारी झाली. 

Zepto Delivery Boy : ‘झेप्टो’ आस्थापनाच्या अहमद लष्कर या ‘डिलिव्हरी बॉय’ने ग्राहकाच्या गुप्तांगाला केला स्पर्श !

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

जागरण किंवा गोंधळ करतांना त्यात अश्लीलता आणणार्‍यांवर बहिष्कार घाला !

व्यावसायिकतेच्या नावाखाली अशा प्रकारे जागरण किंवा गोंधळ यांचे विकृतीकरण करणारे आणि पहाणारे यांच्यावर देवतेची कृपा होण्याच्या ऐवजी तिची अवकृपाच होईल, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील ८५ टक्के भिकारी ‘व्यवसाय’ म्हणून भीक मागतात !

मुंबईसारख्या शहरामध्ये भिकार्‍यांच्या टोळ्या कार्यरत असल्याचे प्रकार यापूर्वीच्या पोलीस कारवायांतून उघड झाले आहेत. या व्यवसायाच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन भिकार्‍यांमागील गुन्हेगारीला संपवण्यासाठी गृहविभागाने ठोस पाऊल उचलणे आवश्यक !

वेशभूषा सकारात्मक हवी !

आजची मुले म्हणजे देशाची भावी पिढी आहे. तिच्यावर अयोग्य किंवा विकृत गोष्टी, हिंसक वृत्ती यांचे कुसंस्कार होऊ नयेत, याची काळजी शाळा आणि पालक यांनी घ्यावी !

निवडणुकीच्या प्रसारासाठी पैशांचा उपयोग, नियमित १०० कोटी रुपये जप्त !

लोकसभेच्या निवडणुकीत १ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत अवैधरित्या वापरण्यात येत असलेली तब्बल ४ सहस्र ६५० कोटी इतकी रक्कम कह्यात घेण्यात आली आहे. या ४५ दिवसांमध्ये देशात नियमित सरासरी १०० कोटी रुपयांची अवैध रक्कम पकडली जात आहे.

Goa College Clashes : कुजिरा महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

नैतिकतेचे धडे केवळ पुस्तकापुरतेच शिल्लक राहिले असल्याने ते मुलांमध्ये रुजवण्यासाठी पालक, शिक्षक यांसह सरकारनेही प्रयत्न करणे अत्यावश्यक झाले आहे !

कारागृहातील कट्टर प्रामाणिक (?) मुख्यमंत्री !

केंद्र सरकारने कलम ३५६ लावून ‘देहलीत राष्ट्रपती राजवट लावावी’, अशी केजरीवाल यांची मनोमन इच्छा असेल, जेणेकरून ‘केंद्रातील मोदी सरकार कसे लोकशाही धुळीस मिळवत आहे’, असे नॅरेटिव्ह चालवता येईल; परंतु त्यांची मनोकामना पूर्ण करतील इतके पंतप्रधान मोदी दुधखुळे नाहीत, हे त्यांना अजूनही समजलेले नाही.

घातक पिचकार्‍या !

‘पिचकारी’ म्हटल्यावर वृंदावनातील होळीची आठवण कुणाच्याही मनात जागृत होऊ शकते; परंतु अशा प्रकारे चित्र-विचित्र पिचकार्‍या आल्या, तर ती आठवण कशी येईल ? त्यामुळे सणांच्या व्यावसायिकीकरणासह परंपरा जपण्याचे भान हवे, असे वाटते.