कोलकाता (बंगाल) – येथे कचरा वेचणार्या एका वयस्कर व्यक्तीने रस्त्यावरील प्लॅस्टिकची पिशवी उचलताच स्फोट झाला. १४ सप्टेंबरला दुपारी १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. यात ती व्यक्ती घायाळ झाली आहे. बापी दास (वय ५८ वर्षे) असे या व्यक्तीचे नाव असून उपचारार्थ दास यांना एन्.आर्.एस्. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसर रिकामे केले असून बाँबशोधक पथकाला पाचारण करणात आले आहे.
संपादकीय भूमिका‘बंगाल म्हणजे अराजक’, असे आता समीकरणच झाले आहे. ही स्थिती पालटण्यासाठी केंद्र सरकार आता तरी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार का ? |