पुणे – हडपसर भागातील भेकराईनगरमधील एका शाळेतील गणेश काकड या शिक्षकाने इयत्ता नववीमध्ये शिकणार्या मुलीचा पाठलाग करून आणि तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार झाला आहे. ही घटना जुलै २०२४ ते २६ ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून संबंधित शिक्षकास अटक करण्यात आली आहे.
१. जुलै २०२४ मध्ये शिक्षक काकड याने तिच्या घरचा पत्ता विचारला. वर्गामध्ये शिकवत असतांना ‘तू माझ्याकडे बघत जा. इकडे-तिकडे बघू नकोस. मी सुंदर आहे’, असे म्हटले.
२. शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वाराजवळ थांबून पीडितेला ‘‘तू घरी चालली आहेस का ? मी तुला घरी सोडू का ? तू कुठे रहातेस ?’’, अशी विचारणा केली.
३. पीडित मुलीने हा सगळा प्रकार उपप्राचार्य यांना सांगितला. तेव्हा उपप्राचार्यांनी मुलीला उलट सुनावले. ‘तूच तशी आहेस, म्हणून तुला सगळे तसे दिसतात’, असे म्हणत तिच्या तक्रारीची नोंद घेतली नाही.
४. २६ ऑगस्ट या दिवशी काकड याने ‘तू शिट्टी का वाजवली ?’, असे विचारत तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी घरी आल्यानंतर पीडितेने ही सर्व घटना आईला सांगितली.
संपादकीय भूमिकाअसे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? |