कुठलेही एक मंदिर बंद होणे, म्हणजे ७ पिढ्यांचे  भवितव्य अंधारमय होणे ! – डिगंबर महाले, अध्यक्ष श्री मंगळग्रह संस्थान, अमळनेर

मंदिरांच्या माध्यमातून सध्या कुठेही न मिळणारी मनशांती विनामूल्य प्राप्त होते. आपली आध्यात्मिक केंद्र असलेल्या मंदिरांचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी संघटन होणे आवश्यक आहे.’’

मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी रत्नागिरी येथे १० मार्चला होणार महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

मंदिर न्यास अधिवेशन केवळ निमंत्रितांसाठी असून अन्य कुणाला सहभागी व्हायचे असल्यास ९४२२०५०५६०, ८९८३२६५७५९ या क्रमांकांवर संपर्क साधून रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून करण्यात आले आहे. 

मुंबईजवळील घारापुरी गुहा भगवान शिवाचे प्राचीन स्थान; महाशिवरात्रीला पूजेची अनुमती मिळावी !

महाराष्ट्र मंदिर महासंघाची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी !

पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील शेकडो प्राचीन धार्मिक स्थळी पूजेचा अधिकार मिळण्यासाठी मुंबईत आंदोलन !

‘घारापुरी लेणी’ (एलेफंटा केव्हज्) येथील शिवमंदिरात हिंदूंना महाशिवरात्री पासून नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा तसेच पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील सर्व हिंदू मंदिरांमध्ये हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी मुंबईत आंदोलन !

संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची तात्काळ ‘सीआयडी’ चौकशी करा ! – बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा

विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून प्रशासक नेमण्यापूर्वी ज्या भाविकांनी दागिने दान म्हणून दिले, त्यांच्या नोंदी नाहीत, तसेच देवस्थानाकडे नेमक्या किती भूमी आहेत ? याच्याही नोंदी नाहीत. त्यामुळे ज्या विश्‍वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. याच समवेत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे.

मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या ! – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत, चैतन्याचे स्त्रोत आहेत. ते टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. मंदिरांचे पावित्र्य राखणे, संघटन करणे, सुव्यवस्थापन करणे हे सर्व कार्य ईश्‍वराचे अधिष्ठान ठेवून करणे आवश्यक आहे.

आज माणगांव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’

मंदिरांच्या प्राचीन प्रथा-परंपरा यांचे संरक्षण आणि संवर्धन, मंदिरांचे व्यवस्थापन, पुरातन मंदिरांचे जतन, मंदिरांतील समस्या सोडवणे यांसाठी २० फेब्रुवारी या दिवशी कुडाळ तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’ होत आहे.

मंदिरांच्या रक्षणासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा लांजा तालुक्यातील मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

मंदिरांची स्वच्छता, पाय धुणे, पिण्याचे पाणी आदी सोयी, उत्सव आणि यात्रांच्या वेळी सुलभ दर्शन, मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांमधील चांगला समन्वय केल्यास मंदिरे स्वयंपूर्ण होऊ शकतील.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर (पुणे) येथे मंदिर विश्वस्तांची बैठक !

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् मंदिरांचा विकास यांविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बारामती येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत पुरंदर, हवेली आणि पुणे शहर पंचक्रोशीतील मंदिर विश्वस्त बैठकीस उपस्थित होते.

मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अमरावती येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील !