हिंदूंच्या मंदिरांकडे कुणी वाकड्या दृष्टीने पहाणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – नितेश राणे, पालकमंत्री, सिंधुदुर्ग
भारतीय संस्कृतीची नाळ मंदिरांशी जोडलेली आहे. मंदिरे ही समाजासाठी चैतन्याचे स्रोत आहेत; परंतु आज मंदिरांचे सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृतीवर होणारे आघात वेळीच रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.