महड (जिल्हा रायगड) येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला रायगड जिल्ह्यातील १०० हून अधिक मंदिर विश्वस्तांची उपस्थिती !

महड (जिल्हा रायगड) – भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरातील प्राचीन परंपरा पालटण्याचा कोणताही अधिकार नाही. हे निधर्मी राजकारणी कोणतीही मशीद अथवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणत नाहीत. मग हिंदु मंदिरांच्या संदर्भात हा दुजाभाव का ? मंदिर सरकारीकरणाच्या विरोधातील लढा तीव्र करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने मंदिरांच्या विश्वस्तांनी संघटित लढ्यातून मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करूया, असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक श्री. संजय जोशी यांनी केले.
Let us Free Temples from Government Control through the United Movement : Sanjay Joshi, State-coordinator, @mandirmahasangh
More than 100 trustees attend the ‘Maharashtra Mandir Nyas’ convention held at Mahad (Dist Raigad)#ReclaimTemples #FreeHinduTemples@AbhayVartak pic.twitter.com/ne2GZRw5uF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 25, 2025
ते श्री अष्टविनायक क्षेत्र, श्री गणपति संस्थान, महड येथील विश्वशांती मंगल कार्यालय येथे झालेल्या तालुकास्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’त बोलत होते.

अधिवेशनाचा आरंभ वेदमंत्रपठण करून करण्यात आला. यानंतर महड येथील श्री अष्टविनायक क्षेत्र, श्री गणपति संस्थानच्या कार्याध्यक्षा अधिवक्त्या मोहिनी वैद्य, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक श्री. संजय जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री गणपति संस्थान, महड (श्री अष्टविनायक क्षेत्र), महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित या अधिवेशनाला श्री गणपति संस्थान, महाड यांचे विश्वस्त अधिवक्ता विवेक पेठे आणि श्री. किरण काशीकर आदी मान्यवरांसह रायगड जिल्ह्यातील १०० हून अधिक मंदिर विश्वस्त यांच्यासह विविध मंदिरांचे प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते आणि मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक
मंदिर महासंघाचे कार्य पुढे नेऊया ! – अधिवक्त्या मोहिनी वैद्य, कार्याध्यक्षा, श्री गणपति संस्थान, महड (श्री अष्टविनायक क्षेत्र)

विचारवंत एकत्र आल्याने संघटन होते. संघटितपणे केलेले कार्य प्रभावी होते. मंदिर महासंघाचे कार्य तळमळीने आणि जोमाने चालू आहे. हे कार्य पुढे नेऊया, अशी विनंती मी मंदिर विश्वस्तांना करते.
मंदिर विश्वस्तांनी सतर्क राहून मंदिराचा कारभार करावा ! – अधिवक्त्या स्वाती दीक्षित, धर्मादाय ट्रस्ट आणि देखभाल, मुंबई

मंदिराची भूमी हडप करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अप्रामाणिक सरकारी अधिकारी नियुक्त झाले, तर आपोआपच त्या मंदिराच्या भूमीवर नियंत्रण मिळते. मंदिर विश्वस्तांनी सतर्क राहून मंदिराचा कारभार करावा आणि मंदिर सरकारीकरणातून आपल्या मंदिरांना मुक्त ठेवावे.
धर्मांधांचा मंदिर परिसरातील शिरकाव रोखण्याचा प्रयत्न करा ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

इंग्रज आणि मोगल यांनी मंदिर संस्कृती, तसेच हिंदूंच्या धर्मश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सध्या मंदिर, मंदिर संस्कृती, हिंदूंच्या श्रद्धा यांवर आघात होतच आहेत. स्वतंत्र भारतात कायदे लागू झाले असले, तरी मंदिर संस्कृतीवरील आघात थांबत नाहीत. मंदिरांशी संबंधित सेवा-व्यवहार यांमधील धर्मांधांचा वाढता शिरकाव गंभीर आहे. हे रोखण्यासाठी मंदिरांविषयी योजना आखाव्या लागतील.
अधिवेशनात रायगड जिल्ह्यातील मंदिरांमध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणारे धर्मशिक्षण फलक लावणे, मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे यांसह मंदिरे आणि मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार उपस्थित मंदिर विश्वस्तांनी केला.

क्षणचित्रे
१. ‘कानिफनाथांच्या तपसामर्थ्याने पावन झालेल्या मढी येथील यात्रेत एकाही मुसलमानाला दुकान लावू देणार नाही’, असा ठराव तेथील ग्रामसभेने बहुमताने ससंमत केला. याविषयी अधिवेशनात उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी अभिनंदन केले.
२. संवादात्मक सत्रात अधिवेशनातील उपस्थित एक विश्वस्तांनी आगामी काळात मंदिरात करणार असलेले प्रयत्न उत्स्फूर्तपणे सांगितले.
३. श्री. भगवान गणेशकर यांनी अधिवेशनासाठी मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले.