चिपळूण येथे २४ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अधिवेशन
खेड – समाजात सर्व क्षेत्रांत संघटन असते. मंदिर समित्या संघटित नसल्या, तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. संघटनातून समस्या सुटतील. मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे. चिपळूण येथे होणार्या जिल्हा अधिवेशनात अधिकाधिक मंदिरांनी सहभागी होऊया. अधिवेशनाला एकत्रितपणे जाऊया, असे आवाहन श्री काळकाई देवस्थानचे अध्यक्ष श्री. महेश जगदाळे यांनी केले.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने २४ फेब्रुवारी या दिवशी चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हास्तरीय अधिवेशन होणार आहे.
या अधिवेशनाचा प्रचार-प्रसार जिल्ह्यात करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. भरणे येथील श्री काळकाई मंदिरात मंदिर विश्वस्तांची बैठक झाली. या वेळी श्री. जगदाळे यांनी विश्वस्तांचे स्वागत केले आणि बैठकीची प्रस्तावना करतांना त्यांनी उपरोक्त आवाहन केले. या बैठकांना मंदिर विश्वस्तांचा चांगला प्रतिसाद होता. अशा संघटनाची आज आवश्यकता आहे. देवस्थानच्या भूमी आणि देवरहाटी यांमध्ये सरकारी नोंद असल्याने भाविकांसाठी काही सुविधा करण्यासाठी अनुमती मिळत नाहीत. अशा समस्या सोडवण्यासाठी संघटन वाढवू आणि मंदिरे महासंघाला जोडून कार्य करू, अशी मते बैठकीत उपस्थित विश्वस्तांनी व्यक्त केली.
महासंघाच्या कार्याची ओळख आणि २ वर्षांत मिळालेल्या यशाविषयी मंदिर महासंघाचे सुरेश शिंदे यांनी विस्तृत माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे विलास भुवड, शिवाजी सालेकर यांच्यासह २० विश्वस्त उपस्थित होते