एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना गिरीश महाजन यांच्याकडून मानहानीची नोटीस !

मुंबई – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना मंत्री गिरीश महाजन यांनी मानहानीची नोटीस पाठवली होती. काही दिवसांपूर्वी पत्रकार अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांचे एका महिला प्रशासकीय अधिकार्‍यांशी संबंध असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला होता. यावरून एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. या प्रकारावरून गिरीश महाजन यांनी खडसे आणि थत्ते यांना अधिवक्त्याद्वारे मानहानीची नोटीस पाठवली आहे.