Shiv Sena MP Naresh Mhaske’s Demand : औरंगजेबाची कबर नष्ट करावी !

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभेत मागणी

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के

नवी देहली –  शिवसेना (शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी १२ मार्च या दिवशी लोकसभेत बोलतांना छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे.

खासदार म्हस्के पुढे म्हणाले की, भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या एकूण ३ सहस्र ६९१ स्मारके आणि कबरी यांपैकी २५ टक्के वास्तू या मोगल अन् ब्रिटीश अधिकारी यांच्या नावाने उभारलेल्या आहेत. या लोकांनी भारत देश, या देशाची संस्कृती आणि परंपरा यांविरोधात कामे केली होती. औरंगजेबाची कबर त्यांपैकी एक आहे. क्रूर औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची आवश्यकताच काय ? औरंगजेबासह भारताविरोधात कामे केलेल्या सर्वांची स्मारके आणि कबरी नष्ट करायला हव्यात.